पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तरूणींना पैशाचे आमिष पडले महागात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पुणे | Pune Crime – सध्या सेक्स रॅकेटच्या (Sex Racket) अनेक घटना घडताना दिसत आहेत. अनेक तरूणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायात ओढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तर आताही पुण्यातून (Pune) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा तरूणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांची फसवूणक करत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा प्रकार घडला आहे.

लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गिरीश शाम शेट्टी आणि प्रज्योत हिरीआण्णा हेगडे या दोन मॅनेजरांनी तरूणींची फसवणूक करत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. यामध्ये 20 वर्षीय बांग्लादेशीय तरूणीसह कोलकत्ता, हिंजवडी येथील सहा तरूणींचा समावेश आहे.

सामाजिक सुरक्षा विभागानं हॉटेल मनोरा येथे छापा टाकला. त्यावेळी त्यांनी तेथून सहा तरूणींची सुटका केली आहे. तर दोन्ही आरोपी मॅनेजरला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रिडम फर्मच्या सदस्यांना हॉटेल मनोरामध्ये वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तिथे छापा टाकला आणि सहा तरूणींची सुटका केली. तसंच दोन्ही आरोपी मॅनेजर ग्राहकांकडून दीड हजार रूपये घेत होते. त्यातील एक हजार रूपये दोघं वाटून घेत होते तर पाचशे रूपये तरूणींना देत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

admin: