शाहरुखच्या ‘जवान’ चा नवा विक्रम! रिलीजआधीच केली 500 कोटींची कमाई

Shah Rukh Khan Jawan Records : बॉलिवूडच्या बादशाहने (Shah Rukh Khan) चार वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आणि त्यानंतर चाहते आता किंग खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच शाहरुखच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. आता त्याचे ‘जवान’ (Jawan) आणि ‘डंकी’ (Dunky) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.

शाहरुख सध्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने ‘जवान’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून राजकुमार हिरानीने ‘डंकी’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता रिलीजआधीच या सिनेमांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. दोन्ही सिनेमांनी आतापर्यंत 500 कोटींची कमाई केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सिनेमाचे सॅटेलाइट, डिजिटल आणि म्यूझिकल राइट्स विकले गेले आहेत. ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सिनेमांचे राइट्स वैरिड प्येयरने विकत घेतले आहेत. 450-500 कोटींमध्ये त्यांनी या सिनेमाचे राइट्स घेतले आहेत. ‘जवान’ या सिनेमाचे राइट्स 250 कोटी आणि ‘डंकी’चे राइट्स 230 कोटींमध्ये विकले गेले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुखच्या ‘जवान’ या सिनेमाचे राइट्स सर्व भाषांमध्ये विकले गेले आहेत. तर ‘डंकी’ या सिनेमाचे फक्त हिंदीतले राइट्स विकले गेले आहेत. एकंदरीतच दोन्ही सिनेमांनी रिलीजआधीच 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कसा चालतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Dnyaneshwar: