शाहरुख खानची ‘ती’ आयकॅानिक पोझ बनली ट्विटरवर हॅशटॅग

मुंबई | Shahrukh Khan’s Signature Pose On Twitter- बॅालिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तसंच शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. त्याचबरोबर आता त्याच्या चाहत्यांसाठी एक खास बाब समोर आली आहे. शाहरुखची सिग्नेचर स्टेप म्हणजेच ‘ऑपन आर्म्स पोझ’ आता ट्विटरवर हॅशटॅग बनली आहे.

सध्या ट्विटरवर हॅशटॅग शाहरुखखान आणि त्यासोबत त्याची आयकॅानिक पोझसारखे एक खास कॅरेक्टर देखील यामध्ये देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानने त्याचा आगामी चित्रपट जवान चा टिझर रिलीज केल्यानंतर अवघ्या १२ तासानंतरच हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये येऊ लागला आहे.

दरम्यान, मैं हूं ना, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है अशा अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख खान ही आयकॅानिक पोझ देताना दिसला होता. तसंच १९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात शाहरुख म्हणजेच राजने पंजाबच्या पिवळ्या मोहरीच्या शेतात काजोल म्हणजेच सिमरनसाठी हात वर करत दिलेल्या या पोजने असंख्य तरुण चाहत्यांची मने जिंकली होती.

Sumitra nalawade: