Chandrayaan-3 | इस्त्रोनं (ISRO) ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाले आहे. या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशभरात जल्लोष केला जात आहे. तसंच अनेक देशभरातील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये बॉलिवूडच्या कलाकारांचा देखील समावेश आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खाननं (Shah Rukh Khan) एक हटके ट्विट करत इस्त्रोचं कौतुक केलं आहे. शाहरूखनं ट्विट करत म्हटलं आहे की, “चांद तारे तोड लाऊं..सारी दुनिया पर मैं छाऊं. आज भारत और इस्त्रो छा गया. सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचं अभिनंदन. चांद्रयान-3 यशस्वी झालं आहे. चांद्रयान-3 चं चंद्रावर सॉफ्ट-लँडिंग झालं.”
दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 वाजता चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं आणि इस्त्रोच्या कमांड सेंटरमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. गेल्या तीन-चार वर्षांपासून केलेल्या कामाचं चीज आज इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर दिसून आलं.