“शरद पवारनं ज्याला जवळ केलं, त्याला काखेत दाबून मारलं”

मुंबई- Maharashtra Political Crisis : २० जून पासून बंड करत असलेले शिवसेनेचे आणि इतर आमदार यांच्यातील संवादाला महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्राबाहेर असल्याने बंडखोर आमदारांना राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर निशाना साधण्याची चांगलीच संधी सापडलेली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून नेटकऱ्यांनी उचलून धरलेले बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांची रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली आहे. अशातच त्यांनी आज गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्ये केलेलं भाषण व्हायरल होत आहे.

गुवाहाटीतील एका हॉटेल मध्ये सर्व बंडखोर आमदारांत राज्यातल्या राजकीय घडामोडींवर चर्चा सुरु करत असताना शरद पवारांच्या राजकारणातील घटनांच्या आठवणी सांगत असताना शहाजी बापू पाटील यांनी आमदारांना चांगलंच हसवलं. त्यावेळचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

शहाजी बापू पाटील यांनी शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांची आठवण सांगितली. शरद पवारांनी ४० आमदारांना घेऊन कसं बंड केलं आणि वसंत दादांना राजीनामा द्यावा लागला याबद्दल सांगितलं. ‘ज्या ज्या माणसांना शरद पवारानं जवळ घेतलं, त्याला काखेत दाबून मारून टाकलं’ असं बोलल्यानंतर सगळेच बंडखोर आमदार जोरजोरात हसायला लागले.

शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना देखील शरद पवारांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘त्यांच्या नडला साहेब लागू नका, बाकी कायबी निर्णय घ्या, त्याला जवळ करायचच नाय, नाहीतर आपण मेलोच.’ असा स्पष्ट इशारा पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकारण खूपच टोकाला गेल्याचं दिसत आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात देखील पोहोचलं आहे. यावर आता पुढ काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Dnyaneshwar: