“…फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे”; शहाजी पाटीलांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खलबळ!

मुंबई : (Shahaji Bapu Patil On Sharad Pawar) आसाममध्ये महापुराने थैमान घातले असताना गुवाहाटीतून शिवसेनेचे बंडखोर आमदार झाडी, काय डोंगार, काय ते हाटील, एकदम ओक्के म्हणणाऱ्या शहाजी पाटलांवर टीकेची झोड उटली होती. मात्र, यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध झाले. आता त्यांनी आणखी एक धक्कादायक वक्तव्य करुन राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

राष्ट्रवादीचे बारा आमदार आमच्या संपर्कात असून एक मोठा राजकीय भुकंप असल्याचा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले सगळं ठरलं आहे फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे.

शहाजीबापू पाटील यांनी आता थेट राष्ट्रवादी कॉग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. त्यांनी टाकलेल्या मोठ्या राजकीय बॉम्बमुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये काय बदल होणार आहेत याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

शिंदे गटातील आमदारच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा कोणताही आमदार फुटलेला नाही, फुटणार नाही असा दावा त्यांनी केला आहे. आमच्या पक्षाबाबत वेगवेगळ्या अफवा पसवरल्या जात आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करत असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

Prakash Harale: