“…अन रेखा माझी जान”, शहाजीबापूंनी घेतला भन्नाट उखाणा

मुंबई | Shahaji Bapu Patil – शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम-भोसले पाटील हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. “काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…एकदम ओके”, या त्यांच्या डायलाॅगमुळे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी कमी काळात लोकप्रिय झाले आहेत. तसंच शहाजीबापू हे नुकतेच आपल्या पत्नीसहीत झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या पत्नीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत एक भन्नाट उखाणा घेतला आहे. विशेष म्हणजे हा उखाणा ऐकून शहाजीबापूंच्या पत्नीही हसून लाजल्याचं पहायला मिळालं.

‘चला हवा येऊ द्या’च्या आजच्या (18 जुलै) भागात आमदार शहाजीबापू पाटील, त्यांच्या पत्नी रेखी पाटील , माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या पतीसह सहभागी होणार आहेत. तसंच झाडी, डोंगार, हाटीलमुळे लोकप्रिय झालेल्या शहाजीबापू पाटील यांच्या याच संवादाच्या अवतीभोवती थुकरटवाडीतील स्कीट रचण्यात आल्याचं या विशेष भागाच्या व्हिडीओत पहायला मिळतंय.

विशेष म्हणजे या भागात शहाजीबापूंनी खास उखाणा घेतल्याचंही पहायला मिळालं. मातीशी नाळ जोडलेला नेता ही ओळख जपणारा उखाणा घेताना शहाजीबापूंनी सांगोल्यातील नदीच्या नावाचं यमक आपल्या पत्नीचं नाव घेताना जुळवल्याचं पहायला मिळालं. पत्नी रेखाचं नाव घेताना शहाजीबापूंनी, “माझ्या दुष्काळाला पाणी देण्याऱ्या नदीचं नाव आहे माण अन् रेखा माझी जान” असा भन्नाट उखाणा घेतला. हा उखाणा ऐकून रुपाली ठोंबरेंसह किशोरी पेडणेकर यांनाही हसू आलं. तर स्वप्निल जोशीने एक नंबर अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

Sumitra nalawade: