मुंबई : (Shahrukh Khan On Pathan Film) बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ नावाचा चित्रपट येत्या वर्षात येतो आहे. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला आहे. त्यावर शाहरुखनं प्रतिक्रिया दिली आहे. हजारो चाहत्यांसमोर शाहरुखनं त्याच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
दीपिकानं शाहरुखच्या पठाण चित्रपटामध्ये बिकिनी परिधान करुन जो डान्स केला आहे त्याची आता चर्चा सुरु झाली आहे. दीपिकानं भगव्याच रंगाची बिकीनी का घातली, त्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते आहे.
शाहरुख आपल्या त्या भाषणामध्ये म्हणाला की, जे काही होतं आहे त्यामध्ये सोशल मीडियाची भूमिका आपण समजावून घ्यायला हवी. गेल्या काही दिवसांपासून आपण फारच सकुंचित होत चाललो आहोत. त्याचे कारण हा सोशल मीडिया आहे. त्यावर आपण ज्या प्रकारे व्यक्त होतो आहोत त्याचा परिणाम खूपच वेगवेगळ्या रीतीनं होतो आहे. नकारात्मकता सोशल मीडियावर जास्त प्रभाव निर्माण करते. हे विसरुन चालणार नाही.
आपल्याला एक ठाम भूमिका घ्यावी लागते. आपण करत असलेल्या त्या कामाची लोक कशाप्रकारे समीक्षा करतात यावर आपले नियंत्रण नसते. मात्र त्यावरुन जाणीवपूर्वक गोष्टी ठरवल्या जातात की काय असा प्रश्न निर्माण होत असल्याची भीती शाहरुखनं यावेळी व्यक्त केली.