“…तेव्हापासून मी तुझ्याकडे पाहतोय”, शाहरूखची दीपिकासाठी खास पोस्ट!

मुंबई | Shahrukh Khan – बाॅलिवूडच्या किंग खान अर्थातच शाहरूख खान (Shahrukh Khan) हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतो. तसंच तो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. प्रामुख्यानं तो ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मचा वापर करतो. नुकतंच त्यानं प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सोबतचा एक फोटा ट्विट केला आहे. हा फोटो शेअर करत शाहरूखनं दीपिकासाठी खास पोस्ट लिहीली आहे.

शाहरूखनं दीपिका सोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’ आणि ‘आगामी पठाण’ या चित्रपटामधील एकसारख्या दिसणाऱ्या सीन्सचे फोटो एकत्र करून त्याचा एक फोटो तयार केला आहे. 9 नोव्हेंबर 2007 रोजी शाहरूख आणि दीपिकाचा ‘ओम शांती ओम’ हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला दोन दिवसांपूर्वी 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं शाहरूखनं हा फोटो शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत शाहरूखनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “15 वर्ष श्रेष्ठतेची…चिकाटीची…या वर्षांमध्ये तुझ्यासह उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. अगदी सुरूवातीपासून मी तुझ्याकडे पाहतोय…पाहतोय…पाहतोय आणि अजूनही पाहत आहे.” शाहरूखची ही खास पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Sumitra nalawade: