उरुळी कांचन- Pune Rural News | येथील शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कांतिलाल नंदलाल डाकलिया व उपाध्यक्षपदी सारिका विजय मुरकुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वर्हाळ यांनी केली.
यानंतर संचालक मंडळाच्या याच दिवशी झालेल्या बैठकीत मानद सचिवपदी संचालक दत्तात्रय मच्छिंद्रनाथ तळेकर यांची नियुक्ती झाल्याची माहिती संस्थापक राजाराम कांचन यांनी दिली. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे.
यावेळी बिनविरोध निवड झालेले पतसंस्थेचे संचालक मंडळ असे ः संस्थापक-संचालक राजाराम कांचन, कांतिलाल नंदलाल डाकलिया, विलास गव्हाणे, किसन कांचन, राजेंद्र टिळेकर, नंदकिशोर बगाडे, बापूसाहेब बोधे, दत्तात्रय तळेकर, सोनबा चौधरी, संपत चव्हाण, अशोक वैराट, सारिका मुरकुटे, ज्योती पंडित निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वर्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच चेअरमन, व्हा. चेअरमन या पदांसाठीची निवडणूक प्रकिया शनिवारी (दि. ११) पार पडली.
यावेळी कांतिलाल डाकलिया व सारिका मुरकुटे यांनी अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही जागांसाठी एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वर्हाळ यांनी केली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन आदींसह संस्थेचे सभासद व मान्यवर उपस्थित होते.