शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर ?

चाकण – चाकण येथील महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्डच्या (Market Yard) प्रवेशद्वारावर उद्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने (Savitribai Phule’s birth anniversary) महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार (Shard Pawar), माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उद्या येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागलेल्या आहेत. दरम्यान या कार्यक्रमाला दोन्ही नेते येणार असल्याची माहिती महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टचे कार्याध्यक्ष तुकाराम कांडगे (Tukaram Kandge) यांनी दिली.

चाकण, ता. खेड येथील महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर फुले दांपत्याच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होत आहे. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ धरल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार व छगन भुजबळ हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत आहे.

Rashtra Sanchar Digital: