मुंबई: राज्यात सहा महिन्यांचा काळ उलटलाल असला तरीही लाल परी अद्यापही रस्त्यावर धावताताना दिसून येत नाही.उच्य न्यायालयाने निकाल देऊनही परिस्तिथीत अद्यापही जेसे थी च आहे. विशेष म्हणजे निकालाच्या दुसऱ्या दिवशीच संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन राडा घातला.
या प्रकरणी शरद पवार मौन बाळगून असले तरीही आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनाबाबत अनेक भाष्य केले पवार म्हणाले की, एसटी कामगारांच्या आंदोलनाला चुकीचं नेतृत्व लाभलं असल्याने आंदोलक भरकटले.आदल्या दिवशी कोर्टाचा निकाल लागला.तो आमच्या बाजूनी लागल्याच सांगितलं गेलं कौतुक व्यक्त केलं गेलं,गुलाल उधळला गेला जिंकलो म्हणून सांगितलं याच अर्थ एकच आहे ,जे चमत्कारिक नेतृत्व आहे त्यांनी एका व्यक्तीच्या विरोधात जो द्वेष पेरला, त्याचा हा परिणाम आहे. मात्र कामगारांना दोष न देता आंदोलनाच्या नेतृत्वावावर त्यांनी बोट ठेवत दोषी असलेल्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पवारांनी केली.
तसेच या आंदोलनाने आशा प्रकारे हिंसक वळण का घेतले,एवढा मोठा जमाव पवारांच्या निवासस्थानी येतोय याची माहिती पोलिसांनाही कशी मिळाली नाही याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.याप्रकरणी अटकेत असणारे आंदोलकांचे वकील सदावर्ते यांनी आदल्या दिवशी केलेल्या भाषणाचाच हा परिणाम असल्याचं म्हंटलं जातं असून त्याची सध्या न्यायालयीन कोठडीत चौकशी सुरू आहे.