कांदा प्रश्नावरून शरद पवार संतापले; म्हणाले, “रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही…”

नाशिक | Sharad Pawar : कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी (Onion Export Ban) घातली आहे. त्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यावरून राज्यातील शेतकरी चांगलेच संतापले आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. आज नाशिकच्या (Nashik) चांदवडमध्ये शरद पवारांची सभा होत आहे. या सभेत पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी शरद पवार म्हणाले की, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाहीये. कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टी केली जातीये. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठली पाहिजे. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही.

ज्यांच्या हातामध्ये धोरण ठरविण्याचे अधिकार आहेत त्यांना जर जाण नसेल तर शेतकरी उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. मागे मी मनमाडला आलो होतो तेव्हा मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की, सरकार कांद्यासंदर्भात काही निर्णय घेत आहे. त्यामुळे मी सगळे कार्यक्रम थांबवून तातडीनं दिल्लीला गेलो होतो. ज्यावेळी मी दिल्लीला गेलो तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले होते. याबद्दल मी अध्यक्षांना विचारलं असता त्यांनी कांद्याचे भाव खूप वाढल्याचं सांगितलं, असं शरद पवारांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असं मला अध्यक्षांनी विचारलं. त्यावर मी त्यांना सांगितलं की, दोन पैसे शेतकऱ्यांना मिळत असतील तर मिळून द्या, असंही शरद पवार म्हणाले.

Sumitra nalawade: