भरणे कुटुंबीयांचे खासदार पवार यांच्याकडून सांत्वन

इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई ऊर्फ जिजी विठोबा भरणे यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भरणेवाडी येथे येऊन भरणे कुटुंबाचे सांत्वन केले.

गिरीजाबाई ऊर्फ विठोबा भरणे यांच्या निधनाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह भरणे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देशाचे नेते शरद पवार यांनी भरणेवाडी निवासस्थानी भेट देऊन संपूर्ण भरणे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे, मधुकर भरणे आणि दत्तात्रय भरणे ही चारही भावंडे व भरणे परिवार उपस्थित होता. भरणे कुटुंब शेतकरी असल्याचे सांगितले.

गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्यावर मागील काही दिवसांपासून अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता भरणेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते.

Dnyaneshwar: