मुंबई : (Sharad Pawar On Ajit Pawar) एक महिन्यापुर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षाप्रमाणे उभी फुट पडली राष्ट्रवादीत फुट पडली असून, शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. अनेक आमदारांनी सरकारला समर्थन दर्शविले. त्यानंतरच्या काळात शरद पवार यांच्या वेगवेगळ्या भुमिकांमुळे कार्यकर्ते संभ्रमात होते. नेमकं काम कोणाचं करायचं, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यातचं आता शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्या गटातील जेष्ठ नेते, मंत्री आणि आमदारांनी शरद पवारांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर शंका निर्माण केली जात होती. मागील एक महिन्यापासून कार्यकर्ते देखील संभ्रम अवस्थेमध्ये होते कोणाच्या सोबत राहायचे अन् कोणाचे काम करायंच असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभे राहिले होते. मात्र, आज शरद पवार याच्या एका वक्तव्याने आता सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. ‘कोणाचा झेंडा घेऊ हाती’ अशी परिस्थिती सामान्य कार्यकर्त्याची झाली होती. त्यात आता दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या सर्व शंका दुर करत संभ्रम दुर केला. शरद पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधिक करताना शरद पवार म्हणाले, मनात संभ्रम ठेवू नका, मी कधीच तडजोड करुन भाजपसोबत जाणार नाही, आगामी निवडणुकींच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा, निवडणुकांआधी पुन्हा एकदा आपला विचार लोकांपर्यंत घेवून जा. असे त्यांनी कार्यकत्यांना संबोधित केल आगे.