मुंबई : (Sharad Pawar On Basavraj Bommai) दहा दिवसांपुर्वी डोळ्याचे ऑपरेशन झालं असताना, चिघळलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सिमावादावर राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढील 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं ते म्हणाले आहेत. “माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. पुढच्या 10 दिवसांत दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन होणारं आहे. आज भूमिका घेण्याची वेळ आली आहे त्यामुळं पत्रकार परिषद घेतली आहे”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
पुढे ते म्हणाले, संविधानाने सर्वांना अधिकार दिलेले आहेत, ज्यांनी हे संविधान दिले त्यांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी आज काही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळी चितावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. या सगळ्या बाबीतून स्पष्ट होतं आहे की सीमाभागात किती गंभीर परिस्थिती आहे. आज माझ्याकडे अशी
आज माझ्याकडे खूप गंभीर माहिती आली आहे. तिथं गाड्या तपासणे, कार्यकर्त्यांची चौकशी करणे सुरू आहे. मराठी भाषिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतं आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली. या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होत मात्र ती घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिला.