‘त्या’ गृहस्थांबद्दल केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल – शरद पवार

Sharad Pawar 4Sharad Pawar 4

सातारा : (Sharad Pawar On Bhagat singh Koshyari) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीचा मोर्चावर माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. ते म्हणाले, हा सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल”, असं यांनी सांगितलं. पुढे बोलताना राज्यपालांचे नाव न घेत ते म्हणाले, या गृहस्थांनी ज्या पद्धतीचे उद्गार शिवछत्रपतींबद्दल काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाहायला मिळेल, असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केला आहे.

“मोर्चासाठी परवानगी मिळाली याबाबत मला आश्चर्य वाटत नाही. लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, हे काल मुख्यमंत्री म्हणाले होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची बघ्याची भूमिका आहे याबद्दल लोकांच्या मनात संताप आहे. मी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं होतं, ते म्हणाले होते मोर्चा हा लोकशाहीत अधिकार, त्यामुळे परवानगी मिळेल यात शंका नव्हती. महापुरुषांवरील वक्तव्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल, असं शरद पवार म्हणाले.

Prakash Harale:
whatsapp
line