नागपूर : (Sharad Pawar On Bollywood Statement) बॉलिवूडमधील मुस्लीम टक्क्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “मुस्लीम अल्पसंख्यांकांचं बॉलिवूडमध्ये मोठं योगदान आहे, याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान शरद पवार म्हणाले, देशातील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाचं आणि उर्दू भाषेचं जवळपास सर्वच क्षेत्रात मोठं योगदान आहे. यामध्ये कला, लेखन, कविता यांचा समावेश आहे. त्यामुळेच बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यातही मुस्लिमांचं योगदान मोठं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या बॉलिवूडमधील मुस्लीम कलाकारांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या सिनेमावर बहिष्कार घातले जात आहेत. नुकताच आमिर खानचा लाल सिंह चड्ढा या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मोहिमत सोशल मीडियावर चालवली गेली. त्याचा फटका या सिनेमाला बसला. त्यानंतर आता सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरुष सिनेमाबाबतही तेच घडताना पहायला मिळत असल्याचे पवार यांनी आपली भुमिका व्यक्त केली आहे.