फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते असत्याचा आधार घेत…”

मुंबई : (Sharad Pawar On Devendra Fadnavis) पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. असा गौप्यस्फोट नुकतंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत तसेच सभ्य व्यक्ती आहेत. ते असत्याचा आधार घेत अशी वक्तव्य करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं.

आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला.

आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या.

त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,’ असं फडणवीस म्हणाले.

Prakash Harale: