मुंबई : (Sharad Pawar On Eknath Shinde) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केली तेव्हापासून त्यांच्याकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा सातत्याने होताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप तर रोजच केले जात आहेत. जो व्यक्ती दुसऱ्याच्या राजकीय पक्षावर दावा सांगू शकतो त्याची खरच किव यावी असे सेना नेते म्हणत आहेत. दरम्यान, शिवसेना, धनुष्यबाण, आमदार, खासदार, शाखा, कार्यलये, सर्वाच माझे म्हणणाऱ्या शिंदेंनी आता शिवसेना स्थापनेच्या 56 वर्षेचा परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेली 55 वर्षे शिवसेना प्रमुख बाळासाहेव ठाकरे दादर मधील शिवाजी पार्क या ठिकाणी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने समस्त देशाला संबोधित करत विचारांचे सोनं लुटलं जायचं. त्यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हे कार्य अखंडीत चालू ठेवले. मात्र, आता याच दसरा मेळाव्यावर बंडखोर गटाने दावा केला आहे. त्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे आगामी दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार शिवसेना की बंडखोर शिंदे गट हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, मेळावा घेण्याचा सर्वांना अधिकार असून, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. तसेच राज्यातील वाद चिघळण्यापेक्षा तो टाळला पाहिजे आणि जनतेला शांत ठेवले पाहिजे असा मोलाचा सल्ला पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे. त्यांनी दिलेला सल्ला मुख्यमंत्र्यांना कितपत पचन होणार हे येणारा काळच ठरवेल.