पवारांचा तरुणांना मोलाचा सल्ला! म्हणाले, भाजपकडून तपास यंत्रणेचा होणारा गैरवापर टाळायचा असेल; तर…,”

पुणे : (Sharad Pawar On Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांनी रविवार दि. २० ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात बोलताना राज्यात आणि देशात सुरु असेलल्या परिस्थितीचं वर्णन केलं. यावेळी त्यांनी तरुणांसह सर्वांना सोशल मीडियाच्या वापराबद्दल सूचक विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाकडून होणारा यंत्रणेचा गैरवापर जर टाळायचा असेल, तर सोशल मीडिया हाच एक पर्याय असल्याचे मत त्यांनी सर्वांसमोर मांडले.

शरद पवारांनी देशात सुरु असेलेल्या धार्मिक वादाच्या मुद्द्याला हात घातला. “आम्हाला देशामध्ये धार्मिक युद्दध नकोत, आम्हाला दंगली नकोत, आम्ही शांततेचे पुजारी आहोत. आम्ही लोकांच्या समतेचा आग्रह करणारे आहोत. जर सरकारी यंत्रणा असं करत असेल, ते आम्हाला मंजूर नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आटोक्यात आणता येऊ शकतं.”

“सोशल मीडियाच्या माध्यातून आपण त्यांच्यावर हल्ला केला तर राज्यकर्ते हे परत करण्याच्या आधी विचार करतील. तुम्ही जागरुक राहीलं पाहिजे, रोज काय घडतय त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यात जर तुमच्यातील एकावर हल्ला झाला, तर तुमच्यातल्या ५० जणांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही अधिक संख्येने उत्तर द्याल तेव्हा,तुमच्यावर हल्ला करणारे शंभर टक्के थांबतील.”

पवार म्हणाले की, “आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा पूर्ण दृष्टीकोन हा यंत्रणेचा गैरवापर करणं आणि ते उध्वस्त करणं ही भूमिका घेऊन राज्य करतात. ही भूमिका तरुण पीढीच्या भल्याची नाही, राज्याच्या भल्याची नाही. हे टाळायचं असेल, त्याला आवर घालायचा असेल, तर सोशल मीडिया हा एकमेव पर्याय आहे.

Prakash Harale: