“ज्यांना हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…”, शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई | Sharad Pawar On Raj Thackeray – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज (21 सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “राष्ट्रवादीची उपशाखा असलेल्या नवाबसेनेनं शिवतिर्थावरील टोमणे मेळाव्यासाठी हिंदूत्वाची वचनपूर्वी असं पोस्टर लॉन्च केलं आहे. नवाब सेनेच्या नवाब प्रमुखांनी आदरणीय बाळासाहेबांची भाषणं, मुलाखती आणि पत्रकार परिषदा परत एकदा ऐकण्याची गरज आहे. त्या जर आपल्याकडे नसतील तर आम्ही त्या तुमच्याकडे पाठवू. सत्तेत आल्यावर हिंदुत्व गुंडाळून काँग्रेस, राष्ट्रवादीची लाचारी करायची व सत्ता गेल्यावर हिंदुत्वाची आरोळी ठोकायची. यांची ही भूमिका म्हणजे दुतोंडी आहे,” अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.

याआधीही मनसेकडून अशापद्धतीची टीका करण्यात आली होती. “मनसेकडून असा आरोप केला जातो की शरद पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणीसंग्रहालयातील प्राणी आहे. अशापद्धतीची आरोप केला आहे. या राजकीय वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता?” असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “प्राणी वगैरेसंदर्भातील उल्लेख मी काही करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा (आमदार) विधीमंडळात निवडून आणता येत नाही. त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं,” असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे.

Sumitra nalawade: