“…तर 40 बंडखोरांपैकी एकही आमदार निवडून येणार नाही?” शरद पवारांचं वक्तव्य

Sharad Pawar And Eknath ShindeSharad Pawar And Eknath Shinde

मुंबई : (Sharad Pawar On Shivsena) शिंदे यांनी बंड केल्यावर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना खासदारांची नाराजी बाहेर येऊ लागली आहे. त्यानंतर आज शिवसेनेने भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला साद घालती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी एक-दोन वगळता एकही निवडून येणार नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळं चित्र दिसेल असं पवार यांनी सांगितलं आहे.

पवार म्हणाले, लोकांवर अन्याय होत राहिला तर लोकशाहीच्या चौकटीत राहून रस्त्यावर उतरायचा देखील निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. अनेकजण मला बोलले की, ४० मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळं पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळं चित्र दिसलं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Prakash Harale:
whatsapp
line