नवी दिल्ली : (Sharad Pawar On Supriya Sule and Praful Patel) आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन दिल्लीमध्ये साजरा करण्यात येत आहे. यावेळी पक्षातील अनेक जेष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रवादीत अनेक दिवसांपासून भिकरी फिरवली जाणार असं बोललं होतं. अखेर पवारांनी भिकरी फिरवून दाखवली आहे.
मात्र, काही दिवसांनी राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामी देण्यात आला. त्यामुळे पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा मागे घेण्यास पवारांना भाग पाडले. आज दिल्लीत शरद पवार यांनी भिकरी फिरवली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष जरी शरद पवार असले तरी, कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन नेत्यांच्या नावाची घोषणा केली अन् कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण पाहायला मिळाले. पक्षातील जेष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.