पुणे : (Sharad Pawar On Sushilkumar Shinde) मी सांगतीलं म्हणून सुशिलकुमार शिंदेंनी पोलीस खात्यातील नोकरी सोडली. त्यावेळी मी त्यांना पोटनिवडणूकीत तिकीट मिळवून देतो असं आश्वासन दिलं होतं. मात्र, मी त्यांना तिकीट मिळवून देऊ शकलो नाही. अन् तेव्हा माझ्या डोळ्यात खळकण पाणी आलं, अशी कबुली राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात दिली.
शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांची राजकारणाच्या पलीकडे मैत्री असल्याचे जगजाहिर आहे. याची प्रचिती पवारांनी सांगितलेल्या एका किश्श्याने पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. तत्कालीन सरकारमध्ये मी गृहमंत्री झालो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना वकिली करण्याचा सल्ला दिला. पुढे झालेल्या निवडणुकीत शिंदे यांना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. पुढील काळात त्यांनी पुन्हा मागे फिरून पाहिलं नाही, असं शरद पवारांनी सांगितलं.
पुण्यात जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे लोक ठवाविकच असतात, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.