अंधेरी पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचा पाठींबा कोणाला? पवारांनी केलं दोनचं शब्दात स्पष्ट; म्हणाले…

मुंबई : (Sharad Pawar On Uddhav Thackeray) राष्ट्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. अंधेरी (पूर्व) येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या लढतीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का? अशी चर्चा सुरु होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला अंधेरी पुर्व पोटनिडणूकीत पाठिंबा कोणाला दर्शवणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी पक्ष अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत करणार,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वेगवेगळ्या लावल्या जाणाऱ्या तर्क-वितर्कांना आता पुर्णविराम लागणार आहे. ही निवडणूक खूप अतितटीची होण्याची शक्यता आहे.

Prakash Harale: