“नगरमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवले तर पुण्यात”… पहा काय म्हणाले शरद पवार

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. संबंधित घटना ही अहमदनगरच्या फकीरवाडा भागात घडली. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. संबंधित प्रकार हा रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, याप्रकरणात दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत असताना औरंगाबादमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवल्यानंतर पुण्यात दंगल करण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच फोटो दाखवला तर काय परिणाम होतो? अशा शब्दात शरद पवार यांनी कान टोचले आहेत. मर्यादित भागात तणाव झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. मी ते म्हणत नाही. पण हे घडत नाही. औरंगाबादेत औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचं काय कारण आहे? त्यासाठी पुण्यात आंदोलन करण्याचं कारण काय आहे? फोटो दाखवला त्यातून काय परिणाम होतो? कुणाला पडलंय त्याचं?, असा सवाल शरद पवार यांनी केला.

Dnyaneshwar: