“राज्यपालांचं वक्तव्य शहाणपणाचं लक्षण नाही, त्यांच्या टोपीच्या रंगासारखंच त्याचं अंतःकरण”

मुंबई – Bhagat Singh Koshyari’s Controvercial Statement On Mumbai : “मी बऱ्याचदा महाराष्ट्रातल्या नेत्यांना म्हणत असतो, ‘मुंबई मधून जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढलं तर मुंबईकडे पैसाच शिल्लक राहणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणारंच नाही.” राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानं महाराष्ट्राचं राजकीय वातावारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. सर्वच पक्षांच्या अनेक नेत्यांकडून राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. राज्यातील विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राज्यपालांना राजीनामा देण्याची मागणी देखील केली जात आहे.

राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यपालांचा निषेध केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यामुळे भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाना साधला आहे.

‘राज्यपालांबद्दल आता काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. महाराष्ट्र आणि मुंबई हे सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन जाणारे राज्य आणि शहर आहेत. मुंबईची प्रगती ही सर्वसामान्य माणसांच्या कष्टातून झाली आहे. राज्यपालांनी असं वक्तव्य करणं शहाणपणाचं लक्षण नाही. मी फार खोलात जात नाही, कारण त्यांच्या डोक्यावरच्या टोपीचा आणि त्यांच्या अंतःकरणाचा रंग यांत काहीही फरक नाही’ अशी सडेतोड टीका शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.

Dnyaneshwar: