मुंबई : (Mahavikas Aghadi Mahamorcha Mumbai) महाराष्ट्रात सध्या जे राजकारण (Maharashtra) सुरु आहे त्यावरून जनता नाराज आहे, महाराष्ट्रातील आदर्शांचा अवमान (Chhatrapati Shivaji Maharaj) करण्याच काम सरकार करत आहे. राज्याच्या सीमाभागात समस्या निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जात आहेत. या सर्व बाबींच्या आधारे महाविकास आघाडीकडून (Mahavika Aghadi) आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शरद पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. (Sharad Pawar In Mahmorcha_
काय म्हणाले शरद पवार ?
“७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर मुंबईत लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं, यासाठी हौतात्म्य पत्करायला अनेक तरुण पुढे आले. शेवटी महाराष्ट्र पदरात पडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रात बाहेरचे मराठी भाषिक येण्याचा आग्रह करत आहेत. बेळगाव, निपाणी, कारवार किंवा अन्य भागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी त्यांच्या भावनेशी राज्यातला मराठी माणूस सहभागी आहे. हा महामोर्चा एक इशारा आह. यातून राज्य सरकारने बोध घेतला नाही तर, कशाहीच्या मैदानात त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, याबद्दलची खात्री मला आहे. राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.”
‘महात्मा फुलेंनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. अशा महान व्यक्तीबाबत टिंगल-टवाळी राज्यपालांकडून होत असेल, तर राज्यपाल म्हणून त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल कधी पाहिला नाही. मी स्वत: राज्याच्या विधानभवनात जाऊन ५५ वर्षं झाली. या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम यांनी केलं. पण यावेळी राज्याच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम होत आहे. महात्मा फुले, सावित्रीबाईंबद्दल लाजिरवाणे उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे.”