शरद पवारांचा अजित पवारांना थेट सवाल? म्हणाले, “तुम्ही माझं वाय झालं म्हणता, मग तुम्ही…”

बीड | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला. तुम्ही माझं वय झालं म्हणता, मग तुम्ही माझं काय बघितलं? असा थेट सवाल शरद पवार यांनी केला आहे. तसंच यावेळी शरद पवारांनी राज्य सरकारवरही टीका केली. ते आज (17 ऑगस्ट) बीड येथे झालेल्या सभेत बोलत होते.

अजित पवार गटावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, “तुम्ही माझं वय झालं असं म्हणता, मग तुम्ही माझं काय बघितलं? तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं आहे ठीक आहे. पण, निदान तुम्ही आयुष्यात ज्यांच्याकडून काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडीतरी माणुसकी ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असं केलं नाही तर लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.”

“राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात असलेल्या रूग्णालयात अनेक लोकांचे जीव गेले. रूग्णालयात गेल्यानंतर लोकांना आधार मिळाला पाहिजे. पण राज्य सरकार यावर फक्त बघ्याची भूमिका घेत आहे”, असं म्हणत शरद पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Sumitra nalawade: