शरद पवारांनी घेतली धास्ती? अचानक केली राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त!

नवी दिल्ली Sharad Pawar : मागील महिन्याभरात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनंतर देशभरातील सर्वच पक्ष सतर्क झालेले दिसत आहेत. पन्नास पेक्षा जास्त वर्षे जुनी असलेल्या शिवसेनेची सध्याची अवस्था बघून सर्वच पक्ष प्रमुखांच्या मनात अस्वस्थता दिसत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार एकत्रित येऊन पक्ष प्रमुखांच्याच विरोधात उभा ठाकले. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाला धक्का लागण्याच्या शक्यता देखील वर्तवल्या जात आहेत. अशी वेळ आपल्या पक्षावरही येऊ शकते अशा विचाराने इतर पक्ष सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्षासबंधित मोठा निर्णय घेतला आहे.

शरद पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. संबंधित एक पत्र विभागांच्या प्रमुखांना पाठवलं असून ते व्हायरल झालेलं आहे. त्याचबरोबर पक्षाचा हा निर्णय राष्ट्रीय पातळीवरच घेतलेला असून कोणत्याही राज्यातील पक्षसंघटनेला लागू होणार नसल्याचंही सांगण्यात आलेलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल तत्काळ बरखास्त करण्यात येत आहेत. मात्र, या निर्णयातून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस, राष्ट्रवादी युथ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसला वगळण्यात आल्याचं प्रफुल पटेल यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयानंतर त्यांनाही पक्ष वाचवण्याची धास्ती लागली आहे की काय अशी चर्चा सुरु आहे. शिवसेनेची स्थिती बघूनच पवारांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोलल्या जात आहे.

Dnyaneshwar: