शरद पवारांनी रणशिंग फुंकले! वळसे पाटलांच्या मतदार संघातून करणार राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. तेथून त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये (Junnar) होणार आहे. ही पहिली सभा अजित पवारांसोबत गेलेले माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडेंच्या (Dhananjay Munde) मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्यास संख्याबळाचा विचार करता तर उचित असल्याचेही ते म्हणाले.

कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे पक्षबांधणीसाठी जात असल्याचे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, ज्यांच्याकडून संघटन मजबूत करावी अशी अपेक्षा होती. मात्र काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे नव्या पिढीतील कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये म्हणून मी हा दौऱा सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि त्यातीलही 70-80 टक्के तरूण आमच्या पाठीशी आहेत, हे चित्र आहे. आम्ही कष्ट केले, या तरूणांना दिशा दिल्यास मला खात्री आहे दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र राष्ट्रवादीला अनुकुल होईल.

Dnyaneshwar: