‘शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…’;जितेंद्र आव्हांडाच्या टीकेला अविनाश जाधवांचं उत्तर

jitendra awhad and avinash jadhavjitendra awhad and avinash jadhav

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, माझा चेहरा नाग्याचा फणासारखा आहे अशी टीका करत त्यांनी नक्कल केली. एक तर स्टॅण्डअप काॅमेडीयनच्या जागा खाली आहेत. त्या त्यांनी घ्याव्या. माझा चे्हरा नागाच्या फणासारखा आहे, होय आहे. मला त्याचा अभिमान आहे. मस्ती करणाऱ्यांना तो फणा बरोबर बाहेर काढून दाखवतो. पण तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे. असा खोचक शब्दांत टोला आव्हाडांनी लगावला आहे. यावर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत टीका करण्यात आली आहे.

अविनाश जाधव यांनी आव्हाडांनी केलेल्या टीकेसंदर्भात पत्राकरांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. आव्हाड यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारण्यात आलं असता जाधव यांनी शरद पवारांचा उल्लेख केला. “मला वाटतं त्यांनी चेहऱ्यावर टीका करण्याआधी त्यांच्या नेत्याचा चेहरा पहावा आणि आम्हाला सांगावं की म्हशीच्या कुठल्या भागासारखा त्यांचा चेहरा दिसतो. पण आम्ही असं म्हणणार नाही पवारसाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. पण त्यांनी टीका करताना तारतम्य पाळावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे,” असं अविनाश जाधव म्हणाले. “फुकट तुम्ही पत्रकार परिषदेत तत्वाच्या गोष्टी करता. नंतर अचानक तुम्ही काहीही बडबडता. हे बरोबर नाहीय,” असंही जाधव म्हणालेत.

Sumitra nalawade:
whatsapp
line