“अजित पवारांना अडचणीत अडकवण्याचा शरद पवारांचा डाव”, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | Ashish Deshmukh – सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Protest) संतापाची लाट उसळली आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून अनेक राजकीय नेत्यांनी राज्य सरकावर टीका केली आहे. अशातच आता या प्रकरणावरून भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) अडचणीत अडकवण्याचा शरद पवारांचा डाव असल्याच्या आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.

मराठा समाजाला सोबत घेऊन अजित पवारांना अडचणीत अडकविण्याचा डाव शरद पवारांचा आहे. अजित पवारांना अडचणीत अडकवून त्यांना पुन्हा पक्षात परत आणण्याचा डाव शरद पवारांचा आहे, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.

पुढे आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. जर नार्को टेस्ट करायची असेल तर ती अनिल देशमुखांची करा. त्यांनी गृह मंत्रालयावर खोटो आरोप केले आहेत. तसंच त्यांनी महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणीही देशमुखांनी केली.

admin: