कुस्ती परिषदेतील वादावर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “दुर्देवाने कुस्ती परिषदेत …”

पुणे : (Sharad Pawar’s reaction to the controversy in the wrestling council) दिड महिन्यापुर्वी भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्ती संघ बरखास्त केला, तेव्हापासून राज्य कुस्ती संघटनेमध्ये दोन गट पडले आहे. त्यातच आता पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होवू घातली आहे. पण एक गट नगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेणार आहे. त्यामुळे नेमका कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचं असा प्रश्न कुस्तीगीरासमोर आहे. या वादावर अनेक दिवसांपासून शांत असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, दुर्देवाने कुस्ती परिषदेत दोन गट पडले आहेत. हे खरं आहे. पण मी भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांना घरी बोलवून हा वाद मिटवला आहे. पण दुसऱ्या गटाचीही नगरला स्पर्धा घेण्याची इच्छा आहे. पण मी म्हटलं की, पहिले पुण्याची महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्यवस्थित पार पाडू आणि मग नगरच्या स्पर्धेचं बघुया, तसेच पुण्याच्या कुस्ती स्पर्धेला हजर राहण्याबाबत तारखा बघून ठरवणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे आता दोन्ही दोन्ही गट यावर काय भुमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे की नगर यापैकी कोणत्या ठिकाणी पार पडणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Prakash Harale: