शरद ठोंबरे, शिवेच्छा पाटीलला विजेते

पुणे : पुणे शहर क्रीडा विभाग अंतर्गत भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत शरद ठोंबरे व शिवेच्छा पाटीलने अनुक्रमे पुरूष व महिला जटात प्रथम क्रमांक जिंकला. भारतीय विद्यापीठ, कात्रज येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटक भारतीय विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.पाटील यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेता श्री. कृष्णकुमार राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्पर्धा आयोजिका डॉ. गौरी पाटील (शारीरिक शिक्षण संचालिका), प्रा.डॉ. आशा बेंगळे, प्रो.डॉ. सुदाम शेळके, डॉ. उमेश बिबवे, प्रा. तुषार गुजर व प्रा. अनिरुध्द शर्मा उपस्तित होते.

निकाल – मुले (१० किलो मीटर)
शरद ठोंबरे (श्री शाहू मंदिर महाविद्यालय), प्रशांत जीपाटे (सर परशुरामभाऊ महाविद्यालय), सुज्वल नाईक (आबासाहेब गरवारे महाविद्यालय), प्रथमेश होळकर (मॉर्डन महाविद्यालय शिवाजीनगर), पार्थ तुमगटकर (सर परशुरामभाऊ महाविद्यालय), विश्वतेज कचरे (श्री शाहू मंदिर महाविद्यालय).
मुली (१० किलो मीटर):
शिवेच्छा पाटील (मॉर्डन महाविद्यालय शिवाजीनगर), वृषाली पाटील (आप्पासाहेब जेधे महाविद्यालय), वैष्णवी जावळे (सेंट मिराज महाविद्यालय), प्राची राणे (गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्स), अवनी आपटे (सर परशुरामभाऊ महाविद्यालय), परिणीता शेडे (श्री शाहू मंदिर महाविद्यालय).

Sumitra nalawade: