Share Market : शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीने झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीच्या (Nifty) उसळीसह चांगली सुरुवात आज पाहायला मिळाली. आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सने 300 अंकांनी उसळी घेतली तर, निफ्टीही तेजीत 17500 वर व्यवहार करताना पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 145.06 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 59,280.19 वर उघडला आणि निफ्टी 42.80 अंकांनी म्हणजे 0.25 टक्क्यांनी वाढून 17,455.70 वर होता.
आजच्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात तेजीत व्यवहार करणाऱ्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा (Tech Mahindra), अदानी एंटरप्रायझेज (Adani Enterprises), अदानी पोर्ट (Adani Ports), हिंदाल्को इंडस्ट्रीज (Hindalco Industries) आणि अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospitals) हे शेअर्स आहेत. तर घसरलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक (IndusInd Bank), नेस्ले इंडिया (Nestle India), टायटन (Titan), एसबीआय लाईफ इन्शॉरन्स (SBI Life Insurance) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) या शेअर्सचा समावेश आहे.
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटामुळे अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारावर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अमेरिकन बाजारातील घसरणीचा सध्या भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. जागतिक बाजारातील चढउताराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.