एअर इंडियाच्या विमानातील जेवणात आढळलं धारदार ब्लेड; फोटो व्हायरल

Sharp blade found in Air India passenger mealSharp blade found in Air India passenger meal

एअर इंडियाच्या विमानातील जेवणात आढळलं धारदार ब्लेड

एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाला दिल्या जाणाऱ्या जेवणात ब्लेड सापडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायर झाला आहे. या घटनेमुळे एअर इंडियाच्या फ्लाईटमधील जेवणाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मॅथ्युरेस पॉल नावाचा प्रवासी एअर इंडियाच्या बंगळुरू ते सॅन फ्रॅन्सिसको विमानात प्रवास करत होता. प्रवासादरम्यान जेवण करत असताना अचानक त्याला टणक वस्तू जाणवली. त्याने नीट बघितलं तर जेवणात त्याला ब्लेड आढळून आलं. मॅथ्युरेसने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर त्याने लिहिले, एअर इंडियाचे अन्न चाकूसारखे कापू शकते. भाजलेल्या रताळे आणि अंजीर चाटमध्ये धातूचा तुकडा सापडला, जो ब्लेडसारखा दिसत होता. हे अन्न काही सेकंद चघळल्यानंतरच लक्षात आले. सुदैवाने, मला इजा झालेली नाही. या प्रकारानंतर एअर इंडियाने प्रवाशांच्या जेवणात ब्लेड आढळल्याची वस्तुस्थिती स्वीकारली व या प्रकरणी माफी मागितली.

धक्कादायक बाब म्हणजे भाजी चिरण्याच्या मशीनचा एक पार्ट जेवणात पडला आणि तो थेट एअर इंडियाच्या प्रवाशाच्या ताटापर्यंत पोहोचला. जेवण बनवताना, भाज्या चिरायच्या मशीनमधून एक पार्ट पडला आणि तो थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचला. खुद्द एअर इंडियानेच तशी कबुली दिली आहे. भरपाई म्हणून कंपनीनं मॅथ्युरेसला वर्षभर वैध असलेलं बिझनेस क्लासचं तिकीट देऊ केलं. मात्र ती एक प्रकारची लाच आहे, असं म्हणत त्यानं ते तिकीट नाकारलं.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line