यम्मी आणि स्पायसी शॉरमासाठी शॉरमा बाइट

शॉरमा हा आजकालच्या तरुणाईचा सगळ्यात आवडता पदार्थ. कुठेही बाहेर फिरायला जाताना किंवा कॅालेजला जाताना, पार्टी करायची असेल तर आजकालची तरुणाई शॅारमावर ताव मारताना दिसतात. पण फक्त आजच्या तरुणाईलाच शॅारमा खायला आवडत नाही तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडायला लागलं आहे. त्यामुळे असे शॅारमा प्रेमी एखाद्या प्रसिद्ध कॅफेच्या शोधात असतात. तर अशाच खवय्यांसाठी शॅारमा बाइट हे कॅफे प्रसिद्ध आहे. शॅारमा बाइट हे कॅफे वसंत कांबळे यांचं कॅफे आहे. त्यांच्या या कॅफेला खवय्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. शॅारमा बाइट हे कॅफे सर्व्हे नं. 35/1 टिळकनगर, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे आहे. तसंच या कॅफेची अरेबियन शॅारमा, चिकन शॅारमा, शॅारमा प्लेट, स्पेशल शॅारमा, चिकन मोमोज, तंदुरी मोमोज, व्हेज चीज मोमोज, थिक कोल्ड कॅाफी, चॅाकलेट कॅाफी, लेमन आईस टी, पिच आईस टी, मोजीटो, फेंच फ्राईज, रोल, व्हेज रोल, चिकन रोल, पनीर रोल असे अनेक पदार्थ आणि पेय त्यांची खासियत आहे.

विशेष म्हणजे शॅारमा बाइट या कॅफेने त्यांच्या शॅारमा आणि अन्य पदार्थांची चव कायम आणि दर्जेदार ठेवल्याने या कॅफेने खवय्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. शॅारमा बाइट या कॅफेत वेगवेगळ्या ठिकाणांहून येणारे खवय्ये नेहमी भेट देत असतात. विशेष सांगायचं झालं तर या शॅारमा कॅफेची अप्रतिम रचना, त्यांचे आदरातिथ्य आणि त्यांचे दर्जेदार चवीचे पदार्थ यामुळे येथे खवय्ये नेहमी आकर्षित होतात. तसेच येथे मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच खिशाला परवडेल अशा दरात मिळतात. त्यामुळे या शॅारमा हाऊसमध्ये खवय्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. तर सुट्टीचा दिवस असो किंवा इतर वेळी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, परिवारासोबत टाइम स्पेंड करायचा असेल किंवा पार्टी करायची असेल तर आवर्जून शॅारमा हाऊला भेट द्या. कारण शॅारमा बाइट या कॅफेचा शॅारमा तुम्ही एकदा खाल तर पुन्हा तेथे तुम्ही याल.

Nilam: