“तिनं लग्नाचा ड्रामा…”, शिव ठाकरेच्या आईचं वीणा जगतापबाबत गंभीर वक्तव्य

मुंबई | Shiv Thakare – सध्या ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) हे पर्व चांगलंच चर्चेत आहे. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये मराठमोळा स्पर्धक शिव ठाकरेनं (Shiv Thakare) त्याच्या उत्कृष्ट खेळीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच सध्या चर्चेत असेलला शिव त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला आहे. ‘बिग बाॅस मराठी’च्या घरामध्ये शिव व वीणा जगताप (Veena Jagtap) यांचं रिलेशनशिप चांगलंच चर्चेत होतं. मात्र, आता त्यांच्या रिलेशनशिपचा दि एण्ड झाला आहे. तसंच नुकतंच शिवच्या आईनं वीणाबाबत गंभीर वक्तव्य केलं आहे.

‘बिग बॉस’च्या घरात सध्या फॅमिली वीक सेलिब्रेट होत आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवची आई त्याला भेटण्यासाठी घरात आली होती. त्यानंतर शिवच्या आईनं टेली चक्करला मुलाखत दिली. त्यांना या मुलाखतीत वीणा व शिवच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “आता हा विषय संपला आहे. वीणा एक चांगली मुलगी आहे. ती बिग बॉसच्या घरात शिवची मैत्रीण म्हणून राहिली. नंतर तिनं शिवबरोबर लग्न करण्याचा ड्रामा केला”, असं म्हणत वीणाबाबत त्यांनी गंभीर वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, शिव व वीणा ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरात रिलेशनशिपमध्ये (Relationship) आले होते. प्रेक्षकांना त्यांची जोडी चांगलीच आवडली होती. तसंच ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरही ते बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर काही काळानं शिव व वीणा एकमेकांपासून वेगळे झाले. जरी ते वेगळे झाले असले तरी आजही अनेकदा त्या दोघांच्या नात्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसते.

Sumitra nalawade: