मुंबई | शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यात शिवसेना नक्की कोणाची यावरून दावे- प्रतिदावे सुरु होते. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढविला होता.
यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जो धनुष्यबाण देव्हाऱ्यात ठेवून पूजत होते. तो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दाखवला होता. आयोगाने कागदी धनुष्यबाण जरी मिंधे गटाला दिला असला तरी बाळासाहेब ठाकरेंच्या पुजेतला धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचं सांगत शिंदे गटावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी उध्दव ठाकरेंना डिवचलं आहे.
यावर आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (Eknath Shinde) यांनीच दिलेला होता… हे तरी लक्षात आहे का? असा सवाल विचारत शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.