“पैसे-मंत्रिपदाच्या लालसेने शिंदे गटात गेलो नाही; तर…”; बच्चू कडूंचं स्पष्टीकरण

मुंबई : सध्या महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे. महाविकास आघाडी सरकार ढासळून आता भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आलेले आहे. मात्र, शिंदे गटासोबत गेलेले आमदार हे पैशाच्या आणि मंत्रिपदाच्या लालसेपोटी भाजपसोबत गेले असल्याचा आरोप राजकीय वर्तुळात केला जात आहे. दरम्यान, यावर प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटात सहभागी होण्यामागचं स्पष्टीकरण दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सरकार भक्कम आहे आणि ते आपला कार्यकाळ पूर्ण करणारच आहे.’ असं कडू म्हणाले. सत्तेत असताना कोणीही सहजासहजी बाहेर पडत नाही. शिवसेनेत आम्ही एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच गेलो होतो. शिंदे आमचे जुने मित्र आहेत. जेव्हा त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

कुठल्याही मंत्रिपदाच्या किंवा पैशाच्या लालसेनं आम्ही शिंदे गटासोबत गेलेलो नाही. मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं आहे. जर मंत्रिपद मिळालं, तर सामाजिक न्याय व अपंग कल्याण सारख्या विभागात काम करायला मिळावं अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

Dnyaneshwar: