मुंबई : (Shinde-Fadnavis cabinet Expansion) शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचा 39 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुहुर्त मिळाला अन् 18 मंत्र्याचा राजभवन येथिल दरबार हाॅल येथे शपथविधी पार पडला. शिंदे-फडणवीस गटातील 9-9 अशा एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, सध्या तात्पुरता मंत्रीमंडळ विस्तार पार पडला असून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. या सर्वांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुणाला कोणतं खातं मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोणाला कोणतं खातं मिळणार हे निश्चित नसलं तरी मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिपदाची यादी फायनल झाली आहे. ही संभाव्य यादी खालील प्रमाणे असण्याची शक्यता आहे.
1) एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री (नगरविकास), 2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ, 3) राधाकृष्ण विखे पाटील – महसुल, सहकार, 4) सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन, 5) चंद्रकांतदादा पाटील – सार्वजनिक बांधकाम
6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास, 7) गिरीश महाजन – जलसंपदा, 8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा, 9) दादा भुसे- कृषी, 10) संजय राठोड- ग्राम विकास, 11) सुरेश खाडे – सामाजिक न्याय, 12) संदीपान भुंभरे- रोजगार हमी, 13) उदय सामंत – उद्योग, 14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री, 15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण, 16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास, 17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण, 18) अतुल सावे – आरोग्य, 19) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क, 20) मंगलप्रभात लोढा- विधी न्याय अशी खाती वाटप करण्याची दाट शक्यता आहे. या छोट्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक दिग्गजांना डच्चू मिळाला आहे.