ठाकरेंना मोठा धक्का! शिंदेंच्या बैठकीला शिवसेनेचे तब्बल ‘एवढे’ खासदार उपस्थित?

मुंबई : (Shinde Group On Join Meeting Shivsena MP) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर मागील काही दिवसांपासून सेना खासदारही चलबिचल झाले आहेत. त्यांच्या मनात सुरू असलेली खदखद ओटात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहिर केलं. त्याप्रमाणे आज सर्वत्र राष्ट्रपतीपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रपतीपदाच्या मतदानानंतर शिंदे गटाची ऑनलाइन पद्धतीने एक बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिवसेनेच्या १२ खासदारांनी हजेरी लावली होती. जवळपास अर्धा तास झालेल्या या बैठकीत नवीन गट स्थापन करण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर आता मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार देखील फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभुमीवर हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Prakash Harale: