ही नेमकी कोणत्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’?, शिंदे गट सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई : (Shinde group trolls on social media) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला यापुढे बाळासाहेबांची शिवसेना गट म्हणून ओळखले जाईल. दरम्यान, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते बाळासाहेब देवरस यांची असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निवडणूक आयोगाने नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ‘आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ असे द्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ‘हे कुठले बाळासाहेब?’ बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सामंत की बाळासाहेब कदम, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब आंबेडकार, बाळासाहेब देवरास यांच्यासह कॅमेडीत अनेक बाळासाहेब आहेत यापैकी कोणते बाळासाहेब? अशी खिल्ली उडवणारे प्रश्नही सोशल मीडिया युजरने एकनाथ शिंदे यांना विचारले आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना असा आशय टाकून वेगवेगळ्या कॅरॅक्टरमध्ये असलेल्या वेगवेगळ्या बाळासाहेबांचे फोटो जोडण्यात आले आहेत. तर शिंदे गटासाठी अजून चिन्ह मिळालेले नाही. आज निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला चिन्ह मिळणार आहे. त्यासाठी शिंदे गटाने तीन पर्याय आयोगाला दिले आहेत.

Prakash Harale: