“या दोन लोकांवर माझा लंय राग हाय, आता कसा धुराळा पाडतो बघा”: शहाजीबापू पाटील

सिंधुदुर्ग : शिंदे गटाचे शहाजी बापूपाटील मागील राजकीय घडामोडींपासून त्यांच्या रांगडी बाण्यामुळं राज्यभर चर्चेत असतात. जे मनात आहे ते सरळ ते बोलून टाकतात. दरम्यान, आज सिंधुदुर्ग मध्ये एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटातील दोन नेत्यांवर त्यांचा खूप राग असल्याचं म्हटलं आहे.

“लोकसभेच्या निवडणुकीला मी कोकणात येऊन धुराळा पडणार. निलेश राणे तुम्ही येऊ नका म्हटलात तरी मी येणार. कारण त्या दोन राऊतांवर माझा लंय रागय. पुढच्या निवडणुकींसाठी मी इथं असणार. राऊतांचा निवडणुकीतील पराभव निश्चित आहे. ते संजय राऊत निवडणुकीला उभा राहत नाहीत नाहीतर तिथं पण गेलो असतो.” असं वक्तव्य करत आपल्या मनातली खदखद त्यांनी बाहेर काढली.

Dnyaneshwar: