छत फाडून घरात पडली उल्कासदृश्य वस्तू; कोपरगावात एकच खळबळ

शिर्डी | कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात किरण ठाकरे यांच्या घरात मंगळवारी सकाळी उल्कासदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली मात्र घराच्या छताचा पत्रा तुटला असून ज्या ठिकाणी ही वस्तू पडली त्या ठिकाणी जमिनीवर खड्डा पडून नुकसान झाले आहे.

सुरुवातीला जोरदार आवाज झाल्याने नागरिकांमधून वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले मात्र नेमकी ही वस्तू काय आहे हे कोणालाच कळेना. कोणी म्हणतो बॉम्ब आहे तर कोणी म्हणे गॅस टाकी फुटली. दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली यावेळी हे उल्का सदृश्य वस्तू असल्याचे त्यांचे निदर्शनास आले असून या वस्तूचे नमुने खगोलशास्त्र विभागाकडे तपासणी करिता पाठवण्यात येणार आहेत.

Dnyaneshwar: