बंडखोर खासदाराला जाब विचारण्यासाठी कोल्हापूरात ‘उद्या’ शिवसैनिकांचा मोर्चा!

कोल्हापूर : (Shiv Sainik will ask question to rebel MP) ‘मातोश्री’च्या जवळचे मानले जाणारे शिवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने हे मागच्या आठवड्यात शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर कोल्हापूरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. याच संदर्भात त्यांना विचारण्यासाठी सोमवार दि. 25 रोजी कोल्हापूरातील शिवसैनिक जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर का केली? असा जाब विचारण्यासाठी घरावर मोर्चा काढणार आहेत.

दरम्यान, खासदार माने यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. शिवसैनिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याची माझी तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळं नेमकं हे का घडलं? कशामुळं घडलं? यासाठी त्यांचा होणार आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देमं हे त्यांचा सहकारी म्हणून माझं कर्तव्य असल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. जिल्ह्यातील राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची भूमिका तळ्यात, होती. खासदार मंडलिक यांनी तर फुटीर शिवसैनिकांना उद्देशून ‘गेले ते बेन्टेक्स राहिले ते सोने’ अशा शब्दात निशाणा साधला होता. धैर्यशील माने यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या दोघांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. 

Prakash Harale: