मुंबई : (Shiv Sena and Shinde Group Final Decision Today Supreme Court) दिड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी बंडखोरी अन् राज्यात शिवसेना आणि शिंदे गटाचा न्यायालयात गेला. आतापर्यंत तीन तारीख झाल्या परंतू कोणताच निष्कर्ष समोर आला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक विकासकामे रखडलेली असताना न्यायालयाकडून फक्त ‘तारीख पे तारीख’ चालू आहे. आज गुरुवारी दि.04 रोजी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बुधवारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली. कालच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता, अध्यक्षांच्या निवडीवर युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली. मात्र, अंतरिम काहीच समोर आले नाही.
दरम्यान, आज होण्याऱ्या न्यायालयाच्या सुनावणात काहीतरी समोर येणे अपेक्षित आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची? याबाबतचे आज न्यायालयात फायनल सामना रंगणार आहे. आणि हा सत्तासंघर्षात सामना कोण जिंकणार? याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.