ठाकरेंच्या उद्या भ्रष्ठाचारी रोखण्यासाठी BMC वर एल्गार; पक्षप्रमुखही राहणार उपस्थित

मुंबई : (Shiv Sena BMC Morcha Uddhav Thackeray) मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला आहे.

शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकरांना संबोधित करणार आहेत.

मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे.

Prakash Harale: